रविवार, १९ जानेवारी, २०१४

तुझी आठवे

तुझी आठवे येतातच नक्की
भयावह स्वप्नांच्या पाठोपाठ
भरून नाहीत येत आता डोळे
स्मरणांचे समुद्र होतात काठोकाठ
 
विद्रूप अनुभवांची किनार
तुझ्याच स्पर्शाने होते सुंदर
कुठलीही अक्राळविक्राळ बाब
सहज करू शकते माझ्यात घर
 
इतकी कशी जागा आहे त्यात
आता तू नाहीस...! तरीसुद्धा ..!!
फक्त आठवणी आहेत तुझ्या तरी
... त्यातलीच पोकळी असेल बहुधा.
 
-    गजानन मुळे

-    १७.१०.२०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!