आपल्या जवळच्याच कितीतरी
गोष्टी
आपण शोधत फिरतो गावभर.
शेपटीमागे लागलेल्या
मोत्यासारखे.
आपण धावतच असतो
सुख, समाधान आणि आनंद
याचं शेपूट शोधत.
पण होतं काय
की आपण शेवटपर्यंत ल्हाकतच
रहातो...
थकत जातो...
खाली – वर, मागे – पुढे,
इकडे – तिकडे..
कुठे कुठे शोधतो आपण ?
शेवटी बावळट वाटणाऱ्या
मोत्यासारखे
आपणही थकून, भागून, पाय
दुमडून...
बसतोच ना एकदाचे.
आणि मग सारं सुख, समाधान
आणि आनंद
आपसूकच आपल्यासमोर येऊन उभे
राहतात
अलगद मोत्याच्या
शेपटीसारखे.
पण धावण्यात... शोधण्यात
मौज असते... हे नक्की.
बस्स !
आपण ठरवायला हवं...
आपल्याला काय हवं...
आपल्याच जवळचं शेपूट
की आणखीन दुसरं काही.
जे शोधताना... पकडताना...
होऊन जाईल पार दमछाक.
पण तरी आपण धावत... शोधत...
रहावं.
त्या शेवटच्या निर्मळ...
निखळ समाधानासाठी.
अविरत... अखंड... एकदातरी !
अविरत... अखंड... एकदातरी !
-
गजानन मुळे
०९/१०/२०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय वाटतं ... तुम्हाला ?.....!