“ अमक्यानं हे अस्सं केलं...तमक्यानं ते तस्सं केलं...अमक्या ठिकाणी हे असं घडलं...ते तसं घडलं...”असलं काही आम्हाला सांगत नका बसू.आमची कळकळीची विनंती आहे तुम्हालाआमचं फक्त एकच ऐका...की...‘ आम्हाला ऐकायचं नाहीय काहीच ‘समजा की आम्ही बहिरे आहोत.साफ म्हणजे अगदी पूर्ण बहिरे.कंठाळीत लगावल्या सारखे.“ ते पहा हे काय चाल्ललंय...या इथे या पवित्र जागेत...हे काय चाल्ललंय .... बघा... तुमच्या डोळ्यांदेखत...!”हे पहा...आम्ही काहीच पहिलं नाही.आम्हाला काहीच दिसलं नाही.तुम्ही आम्हाला उगाच काहीतरीदाखवण्याचा प्रयत्न करत आहात... बळजबरीने.हे इकडे बघाया डोळ्यांवर कातडं ओढलंय आम्ही.त्यामुळे आम्हाला काहीच दिसत नाही.आम्ही चक्क आंधळे झालोय.त्यामुळे आम्हाला तुम्ही काहीही दाखवू नका.आम्हाला काहीच दिसत नाही.आणि आम्ही दिसूही देत नाही कधी.आम्ही बाहेर पडतो तेंव्हाझापड लावून घेतो...घोड्याला लावतात तशी.त्यामुळे आम्हाला दिसतो तोफक्त आमचा...आमच्यापुरता रस्ता.त्या रस्त्यात काहीच विपरीत घडत नाही कधीच... माफ करा आम्ही आंधळे आहोत.“ आहो हे काय बोलताय तुम्हीखरंतर तुम्हीच आवाज उठवायला हवाया सगळ्या गोष्टींबाबत. “एक्सक्युज मी ...ही असली भाषा आम्हाला जमत नाही.आम्ही फक्त आम्हाला वाटेल आणिसर्वांना पटेल असं बोलतो.ललकाऱ्या, घोषणा, ब्रीद वगैरेआम्हाला जमत नाही काहीच.आमच्या जिभेला हाड नाही खरं...म्हणून आम्ही ‘हाडा‘ चे वगैरेकोणी नाही होऊ शकत.त्यामुळे आम्हाल असलं काहीबोलायला सांगू नका.हं आम्ही वारेमाप स्तुती करू तुमची.इतकी की तुम्ही तरंगायला लागाल.आणि आम्ही सहजच निसटून जाऊ...तुमच्या समोरून किंवा खालून.आम्हाल आमची जीभ छाटून घ्यायची नाही.म्हणून आम्ही बोलत नाही ब्र सुद्धा.आम्ही मुकेच आहोत म्हणा ना !“ आहो वेदनांची जाणीव नसेल होत कदाचितपण तुमच्यात काही संवेदनातरी आहे की नाही “हे पहा...आमच्या शरीरात चेतापेशी आहेत...चेतासंस्था आहे...हे खरं आहे.पण वैज्ञानिकदृष्ट्या.पण आम्ही आम्हाला महत्प्रयासाने घडवलंय.आमच्यात संवेदनांचा खून करण्याची ताकद आहे.तेवढी पुरेशी आहे जिवंत राहण्यासाठी.याउपरही तुम्ही काही सांगू... समजावू इच्छित असालतर साफच सांगून टाकतो तुम्हाला...की आम्ही ठार मेलेलो आहोत.सरणावर येणाऱ्या मरणाचीअपेक्षा फक्त जिवंत आहे आमच्यात.- गजानन मुळे
join ithis free marathi e book on facebook
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय वाटतं ... तुम्हाला ?.....!