पालखीचा गोंडा हाले चढताना घाटकिती काट्याकुट्यांची अवघड ही वाट
पोचेलच राजा आता एकदाचा घरीडोळ्यांमध्ये आटलेली खोल खोल दरीशेवटल्या मुजर्याची मान तरी ताठकिती काट्याकुट्यांची अवघड ही वाट
तलवारी भिडतील, खिंडारे पडतीलकिती हात झडतील, कोण किती रडतीलकिती काळ वाहील हा रक्ताचाच पाटकिती काट्याकुट्यांची अवघड ही वाट
चुडा – काकनांचा आता फुटणार बांधभाळी पुन्हा कुंकवाचा करपणार चांदइवल्याशा यज्ञात ही आहुती अफाटकिती काट्याकुट्यांची अवघड ही वाट
रण सारायला हवे, कुणी उरायला हवेजुनीच ही ज्योत पण पलिते हे नवेकाळरात्रीचीं कधी या होईल पहाटकिती काट्याकुट्यांची अवघड ही वाट
पालखीचा गोंडा हाले चढताना घाटकिती काट्याकुट्यांची अवघड ही वाट
- गजानन मुळे