डोळ्यांमध्ये थेंब दवाचा नको साठवू सखीत्या थेंबातच वसते दुःखी अश्रूंची पालखी
हसणे असले क्षणाक्षणांवर ; बेहोशीचा काळडोळ्यांमध्येच दडून बसते गळणारे आभाळ
आभाळातून येईल साजन, तुझ्या कुशीला ओलअन् ओठांवर ठेवून जाईल हळवा कातर बोल
बोलायाचे असते तेंव्हा घर मौनानेच भरतेडोळ्यांमधले जुने पुराने आभाळच झरझरते
आभाळातील दवबिंदूंचा नको घेऊ अदमासरात्री अपरात्रीला तुजला छळेल त्याचा भास
- गजानन मुळे- २७.०२.२०१२.
मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२
डोळ्यांमध्ये थेंब दवाचा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय वाटतं ... तुम्हाला ?.....!