अनिवार उन्हाचा ताप, जसा की शाप, अहिल्येला.
मी उगाच मिटतो डोळे, प्राण तळमळे, गुढ सांजेला.
हातात दिशांचे दान, तसे अपमान, उरलेले ओठी.
काहूर की हुरहूर असे ही, तरीही, उरात घनांची दाटी.
मी शब्द दिलेला, मुग्ध झालेला तुला, सांजेच्या वेळी.
नजरेत भग्न गोपुरे, मुकी वासरे, निष्पर्ण काही ओळी.
अनिवार उन्हाच्या झळा, तसा कळवळा, तुझा गं सखे.
माझ्याच किनाऱ्यावर, करू देत घर, तुझी साजिरी दुःखे.
- गजानन मुळे
मंगळवार, १८ डिसेंबर, २०१२
माझ्याच किनाऱ्यावर
शेवटच्या ओळीवर
शेवटच्या ओळीवर
अडावा श्वास
आणि हुंद्क्यांची गंगा
वाहू लागावी...
तशी उभी होतीस तू
त्या दिवशी माझ्या समोर.
तुझ्या डोळ्यात मला
दिसत नव्हता चंद्र
पहाटेच्या प्राजक्तासारखा.तुझा निरागस चेहरा...
गुहेतल्या काळोखासारखा वाटत होता.
आभाळावर ओढावेत ओरखडे तसे
प्रहराचे पाखरू सरकत होते पुढे पुढे....
आणि तिथेच हरवले होते माझे श्वास थोडे ...!!
- Gajanan Mule
फुंकर
प्लीज मला फक्त
एकदाच माफ कर’
एवढं म्हणण्याइतकंही काही
ठेवू शकलो नाही मी स्वतःजवळ.
एकदाच तर येते ही वेळ आयुष्यात...
एकदाच तर वाटत असते ओढ अनामिक...
एकदाच तर उठत असतं हे काहूर...
आणि एकदाच तर दाटते ही हुरहूर...
एकदाच तर
वाटून घ्यायचं होतं आभाळ.
पण...
एकदाच तर ही गोष्ट टाळली...!
आणि अनेकदा
आठवत बसतो फक्त.
“ऐसा होता तो वैसा होता
वैसा होता तो ऐसा होता”
.............
............
कोऱ्या कोऱ्या कागदावर
निरर्थ अक्षरांची फुंकर
......भलतीच भयंकर !!
- गजानन मुळे
नाकारताही आला पाहिजे रस्ता
नाकारताही आला पाहिजे रस्ता
हमरस्त्याला मिळणारा.
मळवाटांवरून चालणाऱ्यांची
दखल घेतच नाही काळ,
त्यांची पाऊलचिन्हे
उमटतात ... मिटतात फक्त ...
रोजच्या रहदारीत
हरवुनही जातात
तितक्याच सहज.
नव्या वाटेची
नव्या दिशेतून
नव्याच पावलांनी
सुरुवात करायलाच हवी.
मग बघ ...
तुझ्या दमदार पावलांच्या
ठशांना पाहून
सांगेल कुणीही नंतर...
कित्येक दिवस की...
“तो...तो या इथूनच तर गेला होता
इथूनच निघाला होता...” म्हणून.
कुणी ना कुणी
टाकेलच ते पाहिलं पाऊल
मग ते तुझंच का नको ?
या पुढच्या प्रत्येक पावलांसाठी
माझ्या हार्दिक शुभेच्छा !!
- गजानन मुळे
फुलपाखरू
मी सुरवंटासारखा
माझ्याच भोवती
विणत बसलोय
माझेच श्वास.
तुम्ही मला
काही सांगण्याची
किंवा समजावण्याची
अजिबात गरज नाही.
मला माहित आहे...
की याच श्वासांचा
एक दिवस
कोश तयार होईल.
आणि त्यात एखाद्या दिवशी
मीच गुदमरून मरून जाईन....
असंच वाटतंय नां तुम्हाला
हरकत नाही मेलो तरी.....
पण मला
हा कोश विणायचाच आहे,
बघायचंयच एकदा
स्वतःत गुरफटून.
मी या इथून निघून जाताना
माझ्या अस्तित्त्वाची
ओळख सांगणारा
एखादा रेशीमधागा
ठेवून जायचाय
या जगात... तुमच्यासाठी.
आणि काय सांगावं
मी एखादवेळ गुदमरण्या ऐवजी
फुलपाखरूच झालो तर ....
मुक्त होईन
हाच कोश पोखरून.....
रंगीत पंख पसरून..... !!
काय सांगावं...!!
- गजानन मुळे
सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१२
मी आजचा दिवस
मी आजचा दिवसतुझ्याशिवायपण ..खरंतर तुझ्यासोबत जगलो.जेव्हा कालची सारी रात्रतुझ्या आठवणीनी व्याकुळ झालीतेव्हांअशा कित्येक रात्रीमी तुझ्या पदरात सोडून आलो ....ही बोच मी दिवसभर सांभाळली.तुही कुठेतरी आजहीअसंच काही करत असशील...... कुठे पोहचलो आपण शेवटी ..!!आजचा दिवस तसा गारव्याचा नाहीपाऊस नाही तसं उनही नाही....हा दिवस धुक्याचा आहे ...मुका मुका .... निःशब्द....पण का कुणास ठाऊकआजही‘कुणीतरी होतं’असं वाटण्याऐवजी‘अजूनही कुणीतरी कुठेतरी आहे’असंच वाटतंय ....!!असंच वाटतंय ....!!- गजानन मुळे
मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१२
फक्त तुझी आठवण म्हणून ...!!
पहिल्या पावसानंतरउठलेल्या मातीच्या वासातपसरलेली हुरहूर ......मनात नकळत उतरणारी.अंगणात उतरलेल्यासांजेचा चेहरा मलूल... कोरडा...किणाऱ्यावरच्याअगणित पाऊलखुणातहरवलेले तुझे पाय...सूर्याच्या सात्विक डोळ्यातवादळात उतरवीत तशी..स्वप्नांची शिडं...बेमालूम उतरलेली.एखाद्या निर्मनुष्य पायवाटेवरवाटचूकल्या वाटसरूसारखेघुटमळणारे आयुष्या...त्यात एखादी सांजदुखऱ्या जखमांचं गोंदण लेऊनतुझा चेहरा देऊन जाणारी.......बिनदिक्कत.मी उद्ध्वस्त वादळाचेउरले-सुरले अवशेष....माझ्या वटीत भरून ठेवतो आहे...फक्त तुझी आठवण म्हणून ...!!- गजानन मुळे
मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१२
ऋण
सांगून कधी का फिटतेशब्दांचे ऋण आभाळीपरतून पाखरे येतीसांजेच्या मलूल वेळीमी टाळत गेलो रस्तेते उजाडणारे अंतरकुठेच पोचलो नाहीहे कळून आले नंतरहातात निखारे फुललेहे ठेचाळताना पायफुंकून पिताना ताकओठांवर आली सायसुनसान रात्रीच्या वेळीमी मिटले जेव्हा डोळेअनुसयेच्या मांडीवरचीतेंव्हा हसली होती बाळे
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)