बुधवार, १७ ऑगस्ट, २०११

हे कसले जगणे


हे कसले जगणे

हे कसले जगणे ...
मीपण छळते क्षणाक्षणाला
विझेल का हे
तिच्या स्तनाच्या मऊ उशीला

    तिच्या आधरांवर
    अस्फुटांचे काही बोल फुलावे
    अन् मिठीत तिचिया
    मज उद्ध्वस्ताचे स्वप्न पडावे

        हे कसले नाते ...
        तिच्या माझ्यातील पुसते अंतर
        ती रडते थोडी ...
        ओठावरती प्राण आणुनी हसते नंतर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!