बुधवार, १७ ऑगस्ट, २०११

तुझा

तुझा

निळशार विस्तीर्ण आकाश
मोठं करतं मन
विसरतो आपण ...
होत जातो त्याचे .

हिरव्या पिवळ्या पानात
लपलेली फुले
सांगू लागतात कहाणी
एका अगम्य पर्वाची
... रम्यपणे.

वास्कटलेला पट
आपसूक जुळतो
टळतो वाद
आपोआपच
पुन्हा फिरू लागतात चक्र
सुरु होतात अगणित

लावण्यमयी रात्री
आणि हळूहळू
होत जातो मी
... त्या विस्तीर्ण आकाशाचा
... अवकाशाचा
...तुझा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!