तू हुंकारांना ‘ हो ’ म्हणतेसकातरवेळी हळवी होतेस ....
निरांजन तेवत ठेवतेसरात्रंदिवस देव्हाऱ्यात,कधी रात्री-अपरात्री आलीच जाग तरतेल-वातीची खात्री करूनचआभाळाला डोळे देतेस.
हसतेस अशी की...संध्याकाळ दाटून येते मनात.आणि रडतानाही... स्फुंदण्याच्या पलीकडे... आक्रोशाच्या अलीकडे ....कुठेतरी उभी असतेस तू .
तुझे डोळे तेंव्हानिरांजनातल्या तेलानेडबडबलेले असतात....आणि खरं सांगू ....त्यावेळी मला नाकापरासारखं जळायला होतं.
तू पाजळतेस् पलितेआंबेचे ... तुळजाईचे ...आणि अंगणातधूळ उडू नये म्हणून ...सडा-सरवण करतेसरोजची रोज .
तू सांभाळतेस घर ....की घरच सांभाळतं तुला....हा असला संभ्रम आताशामला छळत नाही कधीच.
कारण मला कळू लागलंय हळूहळू ....तू झाड आहेस ...काट्याकुट्यांचं.....सावलीचं....बाहुलीचं ..... माऊलीचं ...पानांचं.....कळ्यांचं .....फुलांचं....फळांचं ....
आणि एकूणचधीरोदात्त मातीतखोलवर रुजलेल्यापक्क्या मुळांचं .
तू झाड आहेस ....तू झाड आहेस .....!!
रविवार, ४ मार्च, २०१२
झाड
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय वाटतं ... तुम्हाला ?.....!