तू आज नाही आलास... उद्या येशील !!उद्या नाही .....तर परवा येशील ...!!पण आज ना उद्यातुला यावंच लागेल ...हे तुलाही माहित आहे आणि मलाही.पण असे किती दिवस आणि किती महिनेतू कोरड्याने तुडवत जाणार आहेस ...?तुझ्या करड्या नी कोरड्या पावलांच्याटाचेखाली काय काय तुडवत चाल्लायस...हे एकदा ओल्या नजरेने पाहून तरी घे ...ये ....तू येशीलच कधीतरी ...हे नक्की ...पण वरातीमागून यावेत घोडेतसा येऊन उपयोग काय ....?तहानलेली माती आणितहानलेली गोठ्यात गाय ....!!आभाळभर पाखरं आहेत ...नभ आहे ... वारा आहे ...सारं.....सारं... सारं आहे ....फक्त नाहीस तो तू.आणि तुझ्याशिवाय काहीच नाहीहे तुलाही माहित आणि मलाही
सोमवार, ३० जुलै, २०१२
तू आज नाही आलास
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय वाटतं ... तुम्हाला ?.....!